वाघोली – येथील भारतीय संस्कृती दर्शन आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने मागील दीड वर्षांपासून कोरोना कार्यकाळामध्ये जीव धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कोरोना योध्यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
मागील दीड वर्षांपासून कोरोना महामारीने कहर केला केला असून अशा परिस्थितीत जीवाची परवा न करता अहोरात्र नागरिकांना सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे, अशा कोरोना योध्यांचा सन्मान भारतीय संस्कृती दर्शन आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. यामध्ये आरोग्य सेवक रामकिशन घ्यार यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
यावेळी भारतीय संस्कृती दर्शन आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष सदानंद सरदेशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड, प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी, वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका सुप्रिया पुरोहित, आदि उपस्थित होते.