नाशिक : सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू असताना प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नाशिकमधून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा केली. माजी मंत्री बच्चू कडू आज निफाडच्या दौऱ्यावर आले होते.
‘या’ नेत्यांना दिली उमेदवारी
आमदार बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून निफाड आणि चांदवड या दोन मतदारसंघांचे उमेदवार जाहीर असून निफाडमधून गुरुदेव कांदे तर चांदवडमधून गणेश निंबाळकर यांना प्रहारकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गुरुदेव कांदे हे भाजप ओबीसी सेलचे प्रदेश सचिव होते. त्यांनी भाजपला रामराम ठोकून आज जनशक्ती पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.