प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी मसूद अजहरला शाप द्यायला हवा होता – दिग्विजय सिंग

भोपाळ – साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला शाप दिला असता, तर सर्जिकल स्ट्राईक करावाच लागला नसता, अशी टीका काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केली आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना, त्यांनी (हेमंत करकरे) मला चुकीच्या पद्धतीने फसवले होते. मी त्यांना सांगितले होते कि, तुमच्या पूर्ण वंशाचा सर्वनाश होईल. बरोबर सव्वा महिन्याने सुतक लागते. ज्या दिवशी जेलमध्ये गेले होते त्याच दिवशी सुतक सुरु झाले. आणि बरोबर सव्वा महिन्यांनी दहशतवाद्यांनी त्यांना मारले आणि त्याच दिवशी त्यांचा अंत झाला, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले होते. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर सगळीकडूनच जोरदार टीका होत होती.

याच वक्तव्याचा आधार घेत दिग्विजय सिंग यांनी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर घणाघात केला आहे. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा शाप इतकाच प्रभावी असेल तर, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला शाप द्यायला हवा होता, म्हणजे भारताला सर्जिकल स्ट्राईकच करावा लागला नसता, असे त्यांनी म्हंटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.