प्राग – चेक प्रजासत्ताकच्या क्रिस्तिना प्लिस्कोवाने क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिकचा पराभव केला व प्राग ओपन टेनिस स्पर्धेत आगेकूच केली. बुधवारी झालेल्या सामन्यात प्लिस्कोवाने मार्टिकवर 6-1, 7-5 अशी सहज मात केली.
करोनाच्या धोक्यानंतर जागतिक टेनिसमध्ये सुरू झालेली ही एक मानांकित स्पर्धा आहे. या स्पर्धेत गेल्यावर्षीची विम्बल्डन विजेत्या सिमोना हालेपनेही विजयी सलामी दिली. मात्र, तिला पहिल्याच सामन्यात विजयासाठी झगडावे लागले होते. त्यामानाने प्लिस्कोवाची लढत सोपी ठरली. तिने मार्टिकविरुद्ध पहिला सेट 6-1 असा सहज जिंकला.
त्यानंतर मार्टिकने व्हॅली व बेसलाइनवरून सुरेख खेळ केला व प्लिस्कोवाला चांगली लढत दिली. हा सेट टायब्रेकरमध्ये गेला तेव्हा सामन्यात रंगत निर्माण झाली होती. मात्र, प्लिस्कोवाने सलग दोन मॅचपॉइंट घेत सामना जिंकला. मार्टिकने टाळता येऊ शकतील अशा चुका केल्याने तिला सामना गमवावा लागला.