पुणे – प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील 7 हजार 425 कुटुंबांना घरे दिली जाणार आहेत. राज्य शासनाकडून उद्दिष्टामध्ये वाढ केली असून पूर्वी हे उद्दिष्ट 1 हजार 125 एवढे होते.
याबाबत जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून देण्यात आली.
योजनेतून 2020-2021 या वर्षासाठी राज्य शासनाकडून पुणे जिल्ह्यासाठी अनुसूचित जाती 564, अनुसूचित जमाती 55, इतर संवर्गासाठी 6 हजार 806 असे एकूण 7 हजार 425 घरकुलांचे उद्दिष्ट दिले आहे.
मागील वर्षात 3 हजार 800 घरे देण्यात आली आहे. तर, काही घरांसाठी जागेची समस्या असल्याने काही लाभार्थ्यांना घरे मिळू शकलेली नाहीत.
तालुकानिहाय उद्दिष्ट
आंबेगावसाठी 171, बारामती 1,611, भोर 451, दौंड 814, हवेली 162, इंदापूर 2,464, जुन्नर 390, खेड 230, मावळ 56, मुळशी 170, पुरंदर 321, शिरूर 432, वेल्हा 153.