Pradeep Purohit on PM Modi । महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल शासक औरंगजेब यांच्यावरून एकीकडे गोंधळ सुरू आहे. त्यात दुसरीकडे आता एका भाजप खासदाराने शिवाजी महाराजांबद्दल असे विधान केले की त्यावरून नवा वाद सुरू झाला. ओडिशातील बारगडचे भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी,”पंतप्रधान मोदी हे मागच्या जन्मात मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज होते.” असे खळबळजनक वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे संसदेपासून सोशल मीडियापर्यंत एकच गदारोळ उडाला.
लोकसभेत बोलताना भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी हे विधान केले आहे. संसदेत बोलताना पुरोहित यांनी,”ते एका संताला भेटले होते. संताने त्यांना सांगितले होते की पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते.” असे सभागृहाला सांगितले. पुढे प्रदीप पुरोहित यांनी, “पंतप्रधान मोदी हे प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास आणि प्रगतीकडे नेण्यासाठी पुनर्जन्म घेतला आहे.” असे धक्कादायक विधान केले. त्यांच्या विधानावरून सर्वत्र गोंधळ उडाला आहे.
भाजप खासदाराच्या विधानाविरोधात संसदेत निषेध Pradeep Purohit on PM Modi ।
भाजप खासदाराच्या या विधानाचा काँग्रेससह अनेक विरोधी सदस्यांनी निषेध केला, त्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अध्यक्षांना विनंती केली की, “जर या टिप्पणीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याचा विचार करावा.”तर खुर्चीवर बसलेले दिलीप सैकिया यांनी प्रदीप पुरोहित यांच्या विधानांची चौकशी करण्याचे आणि त्यांना सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.
काँग्रेसने याला शिवाजी महाराजांचा अपमान म्हटले Pradeep Purohit on PM Modi ।
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रदीप पुरोहित यांच्या विधानावर टीका करत सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुकुट नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ठेवून या लोकांनी शिवाजी महाराजांचा घोर अपमान केला आहे.
अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे.
या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप… pic.twitter.com/N624xkfkQN
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 17, 2025
भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्या विधानाचा सोशल मीडिया वापरकर्तेही निषेध करत आहेत. ते म्हणतात की,”हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक होते, कोणत्याही पक्षाचे चिन्ह नव्हते.’ त्यांचे शौर्य, त्याग आणि विचारसरणी राजकारणाशी जोडल्याने त्यांची महानता मर्यादित होत नाही का?असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.