कोपरगाव – दैनिक प्रभातची वकिलांसाठी तयार करण्यात आलेली डायरी वकिली व्यवसायाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यातील मजकूर अभ्यासपूर्ण असल्याने त्याचा फायदा वकिलांना दैनंदिन कामकाजात होतो, असे प्रतिपादन ऍड. नितीन पोळ यांनी केले.
ऍड. पोळ म्हणाले, या डायरीमुळे वकिलांच्या कामकाजात सुसूत्रता येत आहे. अनेक वेळा न्यायालयाच्या कामकाजामध्ये न्यायाधीशांसमोर एखादा मुद्दा मांडताना डायरी उपयोगी पडते. त्यामुळे कमी वेळेमध्ये उत्कृष्ट काम करण्यासाठी या डायरीचा फायदा होतो. आम्ही दैनिक प्रभातचे नियमित वाचक तर आहोत. वर्तमानपत्रांमध्ये एक वेगळा दर्जा प्रभातचा आहे. सोबतच त्यांची डायरी आमच्या कामकाजासाठी तितकीच फायद्याची आहे, असे सांगत त्यांनी दैनिक प्रभात परिवाराचे आभार व्यक्त केले.
2020 साठी वर्षभराच्या कामकाजाची दैनंदिन माहिती नोंद करण्यासाठी त्यासोबतच कोणत्या कामाला कोणत्या टिप्पणीची आवश्यकता आहे, वकिलांच्या दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या अत्यंत महत्त्वाची टिपणे दैनिक प्रभातच्या डायरीमध्ये असल्याने त्याचा फायदा मला गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. ही डायरी वकिलांना मोफत दिली जाते, ही बाब कौतुकाची आहे, अशी प्रतिक्रिया ऍड. येवले यांनी व्यक्त केलीे. दैनिक प्रभातच्या या महत्त्वपूर्ण डायरीचे अनेक वकिलांनी स्वागत करीत दैनिक प्रभात परिवाराचे मनापासून अभिनंदन केले आहे.