चिंबळी/आळंदी (पुणे) – दैनिक ‘प्रभात’च्या 90 व्या वर्धापनदिनानिमित्त खेड तालुक्यातील चिंबळी आणि आळंदी परिसरातील मान्यवरांनी एका छोटेखानी कार्यक्रमात शुभेच्छांचा वर्षाव केला.
दैनिक ‘प्रभात’च्या 90व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून चिंबळीफाटा (ता. खेड) येथील शांताई लॉन्समध्ये आळंदी, चिंबळी परिसरातील वाचकांसाठी शनिवारी (दि. 2) स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातील दीपप्रज्वलनानंतर गणपती पूजन करण्यात आले, त्यानंतर केक कापून स्नेहमेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी दैनिक ‘प्रभात’बाबत मनोगत व्यक्त करून वर्धापनदिनासह नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, राज्य शिक्षक संघटनेचे सदस्य अजित वडगावकर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, माजी सभापती विलास कातोरे, पंचायत समिती सदस्य तथा बाजार समितीचे संचालक अमर कांबळे, डॉ. अनिल काळे, आळंदी नगर पालिकेचे नगरसेवक सचिन गिलबिले आणि शांताई पतसंस्थेचे अध्यक्ष संजय जैद आदींनी आपापल्या मनोगतातून ‘प्रभात’ला शुभेच्छा दिल्या.
आळंदी नगरपालिकेचे माजी नगरसेवक दिनेश घुले, शुभांगी कम्युनिकेशनचे पप्पूशेठ भळगट, सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण, केळगावचे माजी उपसरपंच अमोल वीरकर, मोई येथील इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुकाराम गवारी, माजी सरपंच राहुल गवारी, निघोजे गावच्या माजी सरपंच सुनीता येळवंडे, शिवसेनेचे किरण गवारे, मारुती येळवंडे, चिंबळीचे आदर्श सरपंच आप्पासाहेब लोखंडे, माजी उपसरपंच हेमंत जैद, देविदास मेदनकर, अॅड. प्रीतम शिंदे, रामदास गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, अंकुश बटवाल, आकाश मयूर गायकवाड, आदित्य गायकवाड, ओंकार गायकवाड, युवा नेते दत्तात्रय लोखंडे, आशाताई बटवाल, कुरुळीच्या पोलीस पाटील प्रतिभा कांबळे, सविता गायकवाड, राजश्री जैद, संगीता बटवाल, ओंकार गायकवाड, अभिषेक जैद, नितीन गायकवाड, गुलाब सोनवणे, आकाश पाटोळे, रमाकांत सोनवणे आदी मान्यवरांसह आळंदी, चिंबळी, मरकळ, कुरूळी, मोई, निघोजे, चाकण येथील असंख्य वाचकांनी या स्नेहमेळव्यात भेट देत मेळाव्याची शोभा वाढविली.
स्नेहमेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आळंदीचे ज्येष्ठ पत्रकार एम. डी. पाखरे, चिंबळीचे पत्रकार सुनील बटवाल यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम अत्यंत उत्साहात व सुलभरित्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत पार पडला. शांताई लॉन्सचे सर्वेसर्वा संजय जैद आणि अनुराग जैद यांनी दैनिक प्रभात परिवारास मोलाचे सहकार्य करून स्नेहमेळाव्यासाठी लॉन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘प्रभात’ परिवारातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.
दैनिक प्रभात हा इंग्रजांच्या काळापासून सुरू असून, तो आजवर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला आहे. आकर्षक मांडणीसोबत वाचकांच्या दृष्टीने उत्कृष्ट असे लेखन असल्याने दैनिक ‘प्रभात’ सर्वसामान्यांच्या वाचनाची वाचनाची भूक भागवित आहे.
– राम गावडे, माजी जिल्हा प्रमुख, शिवसेना
स्पर्धेच्या युगातही दैनिक ‘प्रभात’ने आपले स्थान केवळ अबाधित राखले आहे. यात वाचकांची भूक भागेल अशा बातम्या, संपादकीयसह इतर लेख तसेच सुरेख मांडणी, आकर्षक प्रिंट यामुळे ‘प्रभात’ आज प्रत्येकाच्या घराघरात पोहोचला आहे. दैनिक ‘प्रभात’ची उत्तरोत्तर प्रगती होवो या शुभेच्छा.
-बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य, पुणे
‘शांताई’च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
शांताई पतसंस्थेच्या वतीने नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वसामान्यांसाठी उपयुक्त अशी ही दिनदर्शिका उपस्थितांना यावेळी भेट म्हणून देण्यात आली.