#प्रभात_जनसंवाद : आता चर्चा नको तोडगा काढू

पुणे – आपल्या भागातील समस्या आम्हाला पाठवा आम्ही त्याला योग्य प्रसिद्धी देऊ. आजपासून सुरू झालेला जनसंवाद प्रशासन जागे होईपर्यंत सुरूच राहील…

अभिनव कॉलेज   
नऱ्हे येथील तुळजाभवानी माता मंदिर ते अभिनव कॉलेज रस्ता खराब झाला आहे. हा रस्ता तातडीने दुरूस्त होणे आवश्‍यक आहे. खडबडीत आणि दगडामुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे नव्हे तर चालणेही कठीण झाले आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी.
विजय वारके – 9970661495


वानवडी
येथील किर्लोस्कर कंपनीजवळ रस्त्याच्या कामासाठी खोदण्यात आलेले खड्डे अद्याप तसेच आहेत.त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहन चालक या खड्यात पडून अपघात होऊ शकतो.

तुषार पुणेकर – 9922262028


वडगाव शेरी
म्हाडा कॉलनी विमाननगर भागात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत आरोग्य विभागाला अनेक तक्रारी केल्या. तरीही दखल घेतली गेलेली नाही.
शाहरुख सय्यद – 9373716685


वाघोली
नगर रस्त्यावरील वाघेश्‍वर मंगल कार्यालय ते बकोरीपर्यंत रस्त्याच्या बाजूला कचरा टाकला जात असून तो जाळण्यात येतो, त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.
माणिकराव सातव – 9762616161


उंद्री 
आबनावे नगर येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या पालिकेच्या ड्रेनेज लाइनचा पाइप फुटला आहे. अनेक दिवसांपासून त्यातून सांडपाणी वाहत असून दुर्गंधी सुटली आहे.
गणेश आबनावे – 9021278080

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.