जामखेड (प्रतिनिधी) :- आरोळे वस्ती येथील ‘श्रमजीवी वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समस्यांच्या विळख्यात’ या मथळ्याखाली वृत्त दैनिक प्रभात मध्ये प्रसिद्ध होताच शिक्षक विभागासह सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांनी सदर वृत्ताची दाखल घेत स्वखर्चाने आज (दि. २३) जेसीबी मशीनच्या सहाह्याने शाळेच्या भवती असलेले काटेरी झुडपे, गवत काढून टाकले असून गवतावर औषध फवारणी केली. तसेच शाळेच्या वीज जोडणीसाठी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने वीज बील भरण्याबाबत तयारी दर्शवल्याने शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी मोठी मदत मिळाली आहे.
श्रमजीवी वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शेजारीच असलेल्या आरोळे वस्ती येथील गोरगरिंबांचे मुलं-मुली या शाळेत शिक्षण घेतात. मात्र शाळा असुविधेच्या विळख्यात सापडली असल्याने शाळेतील पटसंख्या घटली आहे. त्यातच शाळेचे वीज बिल थकल्याने गेल्या आठ महिन्यापासून विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला होता. परिणामी शाळेचा बोअरवेल असतानाही शिक्षकांना विकतचे पाणी विद्यार्थ्यांना पाजावे लागत आहे. तसेच शाळेसमोर मोठे पटांगण आहे. मात्र दुर्लक्षितपणामुळे या प्रांगणात अस्वच्छता पसरली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना खेळासाठी जागा उरली नाही ,शाळेच्या परिसरात गवत वाढले असून डासांचा उपद्रव वाढल्याने विद्यार्थ्यांचा आरोग्य प्रश्न ऐरणीवर आला होता.
‘जिल्हा परिषद शाळा समस्यांच्या विळख्यात’ या मथळ्याखाली दैनिक प्रभातमध्ये हे वृत्त दि 23 रोजी प्रकाशित करण्यात आले होते. यांची दखल घेत आरोळे वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांच्यासह कार्यकर्त्यांकडून स्वखर्चाने जेसीबी मशीनच्या सह्याने काटेरी झुडपे काढून शाळेचे मैदानाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी परिसरातील गवतावर औषध फवारणी केली तसेच गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनीही पुढाकार घेत शाळेचे थकीत वीज बीलातील काही रक्कम स्वखर्चाने भरण्याची तयारी दर्शवल्याने शाळेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
तसेच यावेळी शाळेच्या अन्य समस्या निवारण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांनी पुढाकार घेतला असून विध्यार्थाना स्वच्छ पाणी मिळावे याकरिता आरो फिल्टर शाळेला भेट देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच शाळेच्या परिसरात लवकरच वृक्षारोपण देखील करण्यात येणार आहे.
यावेळी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, मुख्याध्यापक विठठल जाधव, युवा नेते संतोष गव्हाळे, पत्रकार ओंकार दळवी, पुण्याचे उद्योजक प्रमोद ननवरे, जमिर सय्यद, प्रमोद गव्हाळे,तुषार बोथरा, विक्रांत डाडर, नदु माकुडे, महेश नवगेरे, मधु पवार, कधीर आतार, सागर गिरी, पिनु जावळे, किरण बोराटे, अवि क्षिरसागर, शरद पवार, महेश नवगिरे, बुठय देडे, अकिब कुरेशी, सागर तुपेरे, बबन गव्हाळे, विजय राजकार आदी. उपस्थित होते