‘प्रभात’तर्फे सांगली पूरग्रस्तांसाठी मदत

जैन एकता मंचकडून 2 टन किराणा सामान, कपडे, ब्लँकेट 

पिंपरी – सांगली पूरग्रस्तांसाठी दैनिक प्रभात व तिरूपती नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मदत संकलन उपक्रमातंर्गत पिंपरी-चिंचवड येथील जैन एकता मंचने पुढाकार घेत किराणा सामानाच्या बॅग्ज (सुमारे 2 टन), कपडे आणि ब्लँकेट आदी साहित्य बुधवारी (दि. 28) चिंचवडगाव येथे दिले.

किराणा सामानाच्या प्रत्येक कीटमध्ये गव्हाचा आटा, तुरदाळ, तांदुळ, साखर आणि मसाला आदी साहित्याचा समावेश आहे. लहान मुले, महिला आणि पुरूष अशा एकूण 200 जणांसाठी कपडे देण्यात आले. तर, 50 ब्लँकेटही दिले. मंचाचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक संजय जैन, अध्यक्ष सुभाष सुराणा, कार्याध्यक्ष राजेश सोनिमेंडे, उपाध्यक्ष भरत बेदमुथ्था, सरचिटणीस राहुल मुनोत, जितेंद्र संचेती, किरण संचेती, करूणेश जैन, विनायक बाफना, गणेश गांधी, विजय सोनी, भुपेश संकलेचा, संतोष नहार, सिद्धार्थ लोढा, पारस भटेवरा, प्रशांत बंब, सिल्व्हर गार्डन येथील श्रेया बाजी, सुभाष कटारिया तसेच जैन एकता मंचमधील सदस्य यांच्या सहकार्याने ही मदत पाठविण्यात आली. मंचाचे संपर्कप्रमुख तुषार मुथ्था, रोहित फिरोदिया यांनी नियोजन केले. संबंधित साहित्य बोरगाव आणि बनेवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)