जागतिक डेंग्यू दिनानिमित्त ग्रामस्थांमध्ये जनजागृती
कार्ला – प्राथमिक आरोग्य कार्ला केंद्राच्या वतीने जागतिक डेंग्यू दिनानिमित्त गुरुवारी (दि. 16)कार्ला गावातून प्रभात फेरीचे काढण्यात आली. प्रभातफेरीमध्ये मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य व मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे हे देखील प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी “”येता कणकण तापाची, करा तपासणी रक्ताची”, “”डासाची उत्पत्तिस्थाने नष्ट करू, हिवताप-डेंग्यूला दूर करू” अशा घोषवाक्याद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच जागतिक डेंग्यू दिनाचे महत्त्व व आरोग्याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. मोठ्या उत्सुकतेने ग्रामस्थांनी डेंग्यूपासून बचावाची माहिती घेतली. या प्रभात फेरीचे आयोजन कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डा भारती पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहायक कर्मचारी, आशाताई स्वयंसेविका, सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले होते.