#प्रभात इफेक्ट : रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या वॉर्ड बॉयला अटक

'प्रभात'च्या वृत्ताची दखल; अन्न औषध प्रशासनाची कारवाई

सातारा  (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासन रोजच्या रोज रुग्णालयांच्या मागणीनुसार 35 टक्के रेमिडेसिवीर पुरवठा करीत आहेत. फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये वॉर्ड बॉय रेमिडेसिवीर काळाबाजार करीत असल्याचे समजताच,अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी वॉर्ड बॉयला रंगेहात पकडले.

याबाबत ‘प्रभात’ने दोन दिवसांआधी ‘रेमिडेसिवीर’च्या चिठ्ठ्या नातेवाइकांच्या माथी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून जिल्ह्यात या इंजेक्शनचा काळाबाजाराला वाचा फोडली होती. त्या वृत्ताची दखल घेत, प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अटक केलेला वॉर्ड बॉय रेमिडेसिवीर एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकत असल्याचे निर्दशनास आले आहे. या वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

यापुढे असा कोणी रेमिडेसिवीर औषधाचा काळाबाजार करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.