प्रभात ब्रेकिंग – धरणात रात्रीत 1 टीएमसी पाणी वाढले

पुणे – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे एका रात्रीत जवळपास 1 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा पाणीसाठा 4.91 टीएमसी होता. तो रविवारी सकाळी सुमारे 5. 75टीएसी झाला आहे. शनिवारी रात्री 12 तासात खडकवासला धरणात 22 मिमी, वरसगाव 100 मिमी, पानशेत 82 मिमी तर टेमघर धरणच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 190 मिमी पाऊस झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.