सार्वमतांत काश्मीरने पाकिस्तानचें बाजूने कौल द्यावा
सिकंदराबाद, ता. 12 : काश्मीरात सार्वमत घेतले तर पाकिस्तानीं समाजवादी पक्ष “काश्मीरने पाकच्या बाजूने कौल द्यावा’ असाच निश्चितपणें प्रचार करील, असें येथें आशियाई समाजवादी परिषदेत आलेले पाक समाजवादी पक्ष प्रतिनिधीं महंमद युसूफ खान यांनी निवेदन केलें.
नेहरू-अली भेटीतून कांहीं विधायक बाहेर पडावे..
पंतप्रधान नेहरू व पाकप्रधान अली यांच्या भेटीतून उभय राष्ट्रांच्या दृष्टीने कांहीं विधायक बाहेर पडावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सध्याच्या पाक सरकारला जनतेचा पाठिंबा?-आहेच..
सध्याचे पाक सरकार हितसंबंधी लोकांचे आहे की, सर्व लोकांचा त्याला पाठिंबा आहे असें विचारता त्यांनी- “या सरकारला जनतेचा खरा पाठिंबा नाहीं असें म्हणता येत नाहीं’ असें उत्तर दिले.
पूर्व पाक जनतेचा विद्यमान सरकारला विरोध..
पूर्व पाकच्या जनतेचा विद्यमान सरकारला विरोध असे पूर्व पाकचे प्रतिनिधी प्रो. पुलीन डे म्हणाले. कराची किंवा लाहोरला समाजवादी परिषद भरवणार आहोत असें त्यांनी सांगितले. कॅंबोडियाला
कॅंबोडिया वसाहतीचें स्वातंत्र्य
फ्रेंच योजनेचे स्वागत
प्नॉम पेन्ह, ता. 12 : कॅंबोडियाला फ्रेंच साम्राज्यांतर्गत वसाहतीचें स्वातंत्र्य देण्याची फ्रेंच सरकारच्या योजनेचें कॅंबोडियाच्या राजधानीत स्वागत होत आहें. कॅंबोडियन मंत्रिमंडळाची नुकतीच एक बैठक झाली, त्या बैठकीत असे मत व्यक्त करण्यांत आले की, गेल्या रविवारी फ्रेंच सरकारने कॅंबोडियन स्वातंत्र्याची जी योजना पाठविली, तींत कपात झाली नाहीं, तर कॅंबोडियाला बरेच व्यापक अधिकार मिळाल्यासारखें होईल.
या योजनेत आता वादाचा एकच मुद्दा राहिला आहें. तो म्हणजे फ्रेंच लष्कर कॅंबोडियात किती ठेवावे व त्या लष्करासाठी किती प्रदेश फ्रेंच सरकारला तोडून द्यावा, हा होय.
कोरियाची फाळणी रद्द करण्याची किम सुंगची घोषणा..
टोकियो, कोरियाची फाळणी रद्द करण्याच्या कामीं कोरियन जनतेनें आपल्याला मदत करावी, असें उत्तर कोरियाचे नवे पंतप्रधान किम इल सुंग यांनी कोरियन जनतेला केली आहे.