48 वर्षांपूर्वी प्रभात : पुणे जिल्ह्यातील कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी

पुणे जिल्ह्यातील कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी

पुणे, ता. 30 – कृत्रिम पावसासाठी आतापर्यंत शिरूर, बारामती व पुरंदर या तालुक्‍यात जे प्रयोग करण्यात आले, त्यापैकी 19 प्रयोग यशस्वी झाले आहेत. यासंबंधी सध्या उत्तर प्रदेशात प्रयोग करण्याला अनुकूल असे ढग निर्माण झाले आहेत काय, याची माहिती येथील कृत्रिम पाऊस तज्ज्ञ गोळा करीत आहेत.

महाराष्ट्र-म्हैसूर सीमाप्रकरणी विरोधी पक्षांनी मांडलेला ठराव फेटाळला

मुंबई – आज विधानसभा गृहामध्ये एक तासभर झालेल्या गोंधळानंतर विरोधी पक्षांनी मांडलेला तहकुबी ठराव सभागृहाने फेटाळून लावला. बेळगावमध्ये 24 जुलै रोजी मराठी भाषिकांवर झालेल्या लाठी हल्ल्याबद्दल तसेच मराठी भाषिकांवर केलेल्या कन्नड भाषेच्या सक्‍तीबद्दल म्हैसूर सरकारचा धिक्‍कार करणारा हा ठराव होता.

संपाचा निर्धार पक्‍का

पुणे – “गरजेनुसार किमान वेतनासाठी संप करण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे. आता सरकारने संप बेकायदा ठरविला, वटहुकूम काढला तरी या निर्णयापासून मागे फिरू नका’, असे आवाहन साथी एस. एम. जोशी यांनी संरक्षण कामगारांच्या मेळाव्यात केले.

पाकिस्तानने हटवादीपणाची व न बदलणारी भूमिका घेतल्याने वाटाघाटीत अपयशाचा संभव
रावळपिंडी – भारत-पाकिस्तानच्या अधिकारी पातळीवरील बोलण्यात मोठे विरोधी वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानने आपली हटवादी भूमिका सोडली नाही तर चालू वाटाघाटीत कोणताही करार होण्याची शक्‍यता दिसत नाही.

आज इस्लामाबादमधील पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या कचेरीत दोन तास वाटाघाटीची बोलणी झाली परंतु त्यातून काहीही प्रगती होऊ शकली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.