लोकहो, दिवाळी सण साधेपणाने साजरा करा
नवी दिल्ली, दि. 19 – दिवाळी असो, ईद वा अन्य कोणताही सण असो लोकांनी तो अत्यंत साधेपणाने व काटकसरीने साजरा करावा, असे आवाहन इंदिरा गांधींनी केले आहे. ही सूचना त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना केली आहे.
कर चुकव्यांची माहिती देणाऱ्यांना सरकारी बक्षिसे
पुणे – चुकविलेला प्राप्तिकर, संपत्तीकर वा वारसाकर शोधून देण्यासाठी मदत करणे वा त्याबाबत अचूक कागदपत्रे सादर करणारास शासनाकडून बक्षिस देण्यात येणार आहे. हे बक्षिस वसुलीच्या 10 टक्के परंतु कमाल 25 हजार रुपयांपर्यंत असेल. अशी माहिती आयकर आयुक्तांकडे देता येईल.
भारतात पेट्रोल किंमत किती वाढेल?
नवी दिल्ली – मध्यपूर्वेत युद्ध सुरू असल्यामुळे तेथून भारताला मिळणारे पेट्रोल नेहमीइतके मिळेल किंवा नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यावर आज केंद्रीय मंत्रिमंडळातील राजकीय समिती व आर्थिक धोरण समिती यांनी संयुक्तपणे विचार केला. पेट्रोलच्या किमतीत किती वाढ होईल त्याचा अंदाज घेऊन पुरवठा व नियंत्रण या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देण्यास पेट्रोल खात्याचे मंत्र्यास सांगण्यात आले आहे.
दिवाळीसाठी 20 हजार टन साखर खुली
नवी दिल्ली – केंद्र सरकारने आणखी 20 हजार टन साखर दिवाळीसाठी विक्रीला खुली केली. चालू व पुढील महिन्यात साखर वितरीत होईल.