प्रभासने शेअर केला “साहो’चा खास लूक

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास लवकरच “साहो’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच नुकतेच या चित्रपटाचे एक नवे पोस्टर प्रभासने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. यासोबतच फोटोला एक कॅप्शन देखील दिले आहे.

पोस्टरला “साहो’ चित्रपटाचे दुसरे पोस्टर, असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे. प्रभासने या पोस्टरमध्ये काळ्या रंगाचे लेदर जॅकेट घातले आहे. तो बाईक रायडींग करताना फोटोत दिसत आहे. प्रभाससोबत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत श्रद्धा कपूर झळकणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा चित्रपट येत्या 15 ऑगस्टला सिनेमागृहे गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील एक व्हिडिओ 3 मार्चला म्हणजेच श्रद्धाच्या वाढदिवशी शेअर करण्यात आला होता. श्रद्धाच्या ऍक्‍शन सीनची झलक ज्यात पाहायला मिळाली. तर प्रभासच्या वाढदिवशीही चित्रपटातील स्टंटची झलक प्रदर्शित करण्यात आली होती. प्रेक्षकांची या व्हिडिओला चांगलीच पसंतीही मिळाली. अशात आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)