अनुष्काबरोबरच्या रिलेशनशीपबाबत प्रभासने सोडले मौन

“साहो’ या आगामी सिनेमामुळे प्रभास सध्या खूपच चर्चेत आहे. जवळपास 350 कोटी रुपये बजेट असलेला हा “साहो’ 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. “साहो’ शिवाय आपल्या रिलेशनशीपमुळेही प्रभास चर्चेत आहे. प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या रिलेशनशीपबाबतच्या बातम्या तशा जुन्याच आहेत.

“बाहुबली’ रिलीज झाल्यापासूनच या बातम्या यायला सुरुवात झाली होती. आता त्या पुन्हा वाढल्या आहेत. आता मात्र प्रभासने या अनुष्का शेट्टीबरोबरच्या रिलेशनशेपबाबत मौन सोडले आहे. या बातम्या खऱ्याच आहेत, असे त्याने स्पष्ट केले आहे. आपण दोघे चांगले मित्र आहोत, असे तो म्हणाला आहे.

यापेक्षा आमच्यामध्ये काही खास रिलेशन असते. तर गेल्या दोन वर्षात आम्हाला कोणीही एकत्र बघितलेच नसते, असे प्रभास म्हणाला.

राजामौली आणि राणा दग्गुपतीलाही आपण हे स्पष्टपणे सांगितले असल्याचेही त्याने सांगितले. प्रभास आणि अनुष्का लॉस एंजेलिसमध्ये आलिशान घर शोधत आहेत आणि अनुष्कासाठी “साहो’च्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आल्याचेही ऐकिवात आले होते. रिलेशनशीपबाबतचा प्रश्‍न अनुष्कालाही करण्यात आला होता.

त्यावर “बाहुबली आणि देवसेनाच्या रिअल लाईफ केमिस्ट्रीबाबत काही आशा ठेवू नका.’ असे उत्तर तिने दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.