संजू बाबाच्या ‘तोरबाझ’चा दमदार ट्रेलर रिलीज

संजय दत्तचा लीड रोल असलेल्या “तोरबाझ’ लवकरच नेटफ्लिक्‍सवर रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात संजय दत्त एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या रोलमध्ये दिसणार आहे. सैन्यातून निवृत्त झालेल्या या लष्करी अधिकाऱ्याचा इतिहास अतिशय वेदनादायी, दुःखदायी असतो. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

काबूलमध्ये तो मुलांची क्रिकेटची टीम उभी करण्याच्या प्रयत्नात असतो. मात्र अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना त्याच्या या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असतात. या कट्टरवादी संघटनेच्या म्होरक्‍याचे काम राहुल देव साकारताना दिसतो आहे. त्याला या क्रिकेट खेळाडूंना आत्मघातकी दहशतवादी बनवायचे असते. संजय दत्त आणि राहुल देव यांच्यातील जुगलबंदीची कथा “तोरबाझ’मध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संजय दत्तने हा ट्रेलर ट्‌विटरवर शेअर करताना “जेंव्हा चांगले लोक काहीच करत नाहीत, तेंव्हाच वाईट लोकांचा विजय होतो’ अशी कॅप्शन दिली आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत संजय दत्त फुफ्फुसाच्या विकारावर उपचार घेत होता. त्याने पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे काही आठवड्यांपूर्वीच समजले होते. आता त्याच्या “तोरबाझ’ची स्टाईलच सांगेल की आता त्याच्या ऍक्‍टिंगमध्ये किती दम उरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.