पुणे – वीज तोडल्याने महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत महावितरणमधील वरिष्ठ तंत्रज्ञाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराकडे वीज बिल वसुलीचे काम सोपविण्यात आले आहे. कोंढव्याजवळ असलेल्या उंड्री परिसरात थकीत वीज बिल न भरल्याने कारवाई करण्यात आली. वीज तोडल्याने तिघे आरोपी महावितरणच्या गंगा व्हिलेज कार्यालयात गेले. तंत्रज्ञाला शिवीगाळ केली. त्याला धमकावले.
कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जीवे मारू अशी धमकी देऊन तिघेजण पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. जाधव तपास करत आहेत. तीन दिवसांपूर्वी वीज तोडल्याने शिवाजीनगर गावठाण भागात महावितरणच्या तंत्रज्ञाला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली होती. विमाननगर भागातही वीज कापल्याने महावितरणच्या कर्मचाºयाला धमकावून मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली