राज्यातील सत्ता पेचावर उद्या पुन्हा होणार सुनावणी

उद्या सकाळी प्रकरणातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश
सर्व पक्षकारांना नोटीस जारी

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच हा आज सर्वोच्च न्यायालयात पोहचला होता. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी केली.राज्यातील सरकार स्थापनेचा पेच उद्यावर गेला आहे. सत्तास्थापन करण्यासाठी भाजपाला निमंत्रण देण्याचा निर्णय कोणत्या कागदपत्रांच्या आधारे घेतला. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे उद्या संकाळी 10.30 वाजेपर्यंत सादर करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना दिला आहे.

सरकारच्यावतीनं बाजू मांडतांना तुषार मेहता यांनी “न्यायालयानं आदेश दिल्यास राज्यपालांनी जो निर्णय घेतला, त्यासंदर्भातील कागदपत्रे सादर करू,” असे सांगितले होते. आजची सुनावणी करताना न्यायालयाने राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्‍नचिन्हं उपस्थिती करता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर पुन्हा उद्या सुनावणी करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याच्या आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयाने रविवारी कोणताही निकाल दिला नाही. या प्रकरणी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. राज्यपालांनी ज्या कागदपत्रांच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली आणि राष्ट्रपती राजवट मागे घेतली ते सर्व न्यायालया सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यातील सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.