पावर ग्रीडचा आयपीओ 29 एप्रिलपासून

मुंबई : पावर ग्रीड इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट या कंपनीचा आयपीओ 29 एप्रिल ते 3 मे दरम्यान गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध होणार आहे. आयपीओमधील शेअरचा किंमत पट्टा 99 ते 100 रुपये ठरविण्यात आला आहे.

या माध्यमातून कंपनी 7,735 कोटी रुपये उभे करणार आहे. गुंतवणूकदारांनी आयपीओ घेतल्यानंतर आणि त्याचे वितरण झाल्यानंतर या शेअरची नोंदणी राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारवर केली जाणार आहे. यासाठी अगोदर पासूनच कागदपत्रे दाखल करण्यात आली होती.

मात्र दरम्यानच्या काळामध्ये शेअर बाजारामध्ये बरीच संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे या आयपीओबाबत गुंतवणूकदार काय निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.