हडपसर विधानसभा मतदारसंघात आढळरावांचा जोरदार प्रचार
हडपसर – महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शनिवारी (दि. 20) महायुतीच्या कार्यकर्त्यांसह जोरदार बाईक रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करीत मतदारांना अभिवादन केले. बी. टी. कवडे रस्ता येथील शिवसेना कार्यालयापासून सुरू झालेली ही भारत फोर्ज कंपनी, शिर्केनगर, भीमनगर, जहांगीरनगर, मुंढवा हडपसर रेल्वे स्टेशन, गावठाण, केशवनगर, मगरपट्टा, बांश्री चौक, ऋषिकेश सोसायटी, साधना विद्यालय, माळवाडी, वीटभट्टी चौक, शिवसेना चौक, भैरवनाथ चौक, डीपी रोड, कुबेरा संकुल, रवीदर्शन, लक्ष्मी कॉलनी, सातव वाडी, काळेपडळ, अमरबाग, मंत्री मार्केट, हडपसर वेस, बंटरशाळा, ग्लायडिंग सेंटर, अग्रवाल इलक्ट्रिक, बनकर चौक,भाजी मंडई, गोंधळेनगर, तुकाईदर्शन, यशराज सोसायटी, निर्मल टाऊनशीप, ससाणेनगर, हडपसरगाव आदी भागात काढलेल्या रॅलीमध्ये बाईकवर स्वार झालेल्या कार्यकर्त्यांमुळे सगळा परिसर भगवामय झाला होता.
आढळराव पाटील यांच्यासह आमदार योगेश टिळेकर, नगरसेविका मंगला मंत्री, नगरसेविका हिमाली कांबळे, लता धायरकर, नगरसेवक उमेश गायकवाड, विजय देशमुख, समीर तुपे, भूषण तुपे, विकास रासकर, सुभाष जंगले, के. टी. आरु, प्रभाकर कदम, विक्रम लोणकर, दिलीप झगडे, दिलीप व्यवहारे, संदीप दळवी, चेतन कवडे, शाम नेगल, साहेबराव कवडेंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. तत्पूर्वी सकाळी खासदार आढळरावांनी निवडक मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. शनिवारी दिवसभरात आढळराव यांनी प्रचाराची तिसरी फेरी पूर्ण केली आहे.
शेजारच्या देशांची अर्थव्यवस्था भारतावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या देशाचे नेतृत्त्व कोण करणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. मग आपल्याकडे काय पर्याय आहे. आता राहुल गांधी पर्याय होऊ शकतात का? हे तुम्हीच सांगा. त्यामुळे आजच्या घडीला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्यायच नाही.
-शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार