न्यूयॉर्क : जगातील श्रीमंत उद्योगपती पैकी एक असणारे टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी नुकतंच सोशल मीडियाचे एक माध्यम असणारे ट्विटरचे मालकी हक्क विकत घेतल्याची घोषणा केली होती. मात्र मस्क यांच्या डीलमध्ये सध्या खोडा आला असल्याचे दिसत आहे.
एलॉन मस्क यांनी सध्या ट्विटरसोबतचा करार पूर्ण होऊ शकत नाही अशी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. यामुळे एलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यातील डीलला तात्पुरती स्थगिती दिली असल्याचे दिसत आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटरकडे स्पॅम आणि फेक अकाऊंट्सची एकूण संख्या किती आहे. याबाबत विचारणा केली होती. एलॉन मस्क यांना ट्विटरवर किती ‘फेक’ या ‘स्पॅम’ किंना ‘बॉट्स’ अकाउंट आहेत, याबाबत संपूर्ण माहिती हवी आहे. जोपर्यंत ट्विटरकडून याबाबत योग्य ती माहिती मिळत नाही, तोपर्यंत हा करार पूर्ण होऊ शकत नाही असे मस्क यांनी ट्विट करत म्हटले आहे.