महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती – मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्रात महापरीक्षा पोर्टलद्वारे विविध परीक्षा घेण्यात येतात आणि या परीक्षांच्या आधारेच राज्य सरकारमधील विविध विभागात पदभरती होते. पण आता महापरीक्षा पोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

तसेच, पुढील आठवड्यात होणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. विशेष म्हणजे या त्रुटी दूर झाल्यानतंर परीक्षा या महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतल्या जातील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापरीक्षा पोर्टलबाबत अनेक तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाला आतापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीं प्राप्त झाल्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक बैठक पार पडली. यावेळी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.