सिध्दू विरोधात मोहालीत लागले पोस्टर

मोहाली – अमेठीतून राहुल गांधी हरले तर राजकारण सोडेन, अशी वल्गना करणारे कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिध्दू यांना राजकारण कधी सोडणार असा सवाल करणारे पोस्टर्स मोहालीत झळकले आहेत.

भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये आलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांचे आता कॉंग्रेसमध्ये देखील वाद होऊ लागले आहेत. सिध्दू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशीच वाद ओढावून घेतल्यामुळे त्यांचे खाते बदलण्यात आले आहे. त्यामुळे सिध्दू हे सध्या नाराज आहेत. त्यातच आता अशा प्रकारचे पोस्टर्स झळकल्यामुळे सिद्धू यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1142015291502628864

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)