मुंबई – सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम प्रयोग होत आहे. त्यामुळे आता मराठी भाषेतील चित्रपटांमध्ये हिंदीतील प्रसिद्ध चेहरे देखील दिसू लागले आहेत. दिवसेंदिवस अशा कलाकारांच्या यादीत वाढ होत असून, याच यादीत आता आणखी एक नवीन नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते ‘चंकी पांडे’ यांचं.
दरम्यान, चंकी पांडे ‘विकून टाक’ या मराठी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं ऑफिशल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये चंकी पांडे एका अतिशय श्रीमंत अरब व्यक्तीच्या लूकमध्ये असून, हातात पैशाचे बंडल घेऊन शिवराज वायचळ आणि रोहित माने यांना हाताने मान दाबताना दिसत आहे.
‘बालक पालक’, ‘येल्लो’, ‘डोक्याला शॉट’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ हा चित्रपट येत्या ३१ जानेवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.