बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट्ट ही एक चांगली गायिका देखील आहे. आलियाने “हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात आपल्या उत्कृष्ट आवाजाची झलक दाखविली होती. आता लवकर तिचा एक म्यूझिक व्हिडिओ येणार आहे.
या म्यूझिक व्हिडिओचे “प्राडा’ (Prada) असे नाव असून त्याचा फर्स्ट लुक पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आला आहे.
आलियाने आपल्या आगामी “सडक-2′ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यापूर्वीच हा व्हिडिओ पूर्ण केला होता. या म्यूझिक व्हिडिओमध्ये आलियाशिवाय सुप्रसिद्ध पंजाबी गायक दूरबीन झळकणार आहे. हा व्हिडिओ 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता तो कधी प्रदर्शित होणार हे अद्याप निश्चित नाही.
आलियानेही ट्वीट आणि इंस्टाग्राम पोस्टच्या मदतीने हे म्यूझिक सिंगल लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, आलियाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास तिच्याकडे सध्या ब्रह्मास्त्र, सडक-2 आणि आरआरआर हे तीन चित्रपट आहे. “ब्रह्मास्त्र’मध्ये तिच्यासोबत अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर, तर “सडक-2’मध्ये संजय दत्त, पूजा भट्ट, आदित्य रॉय कपूर, गुलशन ग्रोवर, जिशु सेनगुप्ता आणि अक्षय आनंद झळकणार आहे.