मुंबई- बॉलीवूडमध्ये अभिनेता ‘विकी कौशल’ याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. चित्रपटसृष्टीत आता त्याला हमखास यश मिळविणा-या अभिनेत्यांपैकी एक मानले जात आहे. यावर्षी प्रदर्शित झालेला त्याचा ‘उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट सुपर हिट ठरला होता. आता तो परत एकदा आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.
नुकतच विकीने ट्विटर अकाऊंटवरून आपल्या आगामी ‘भूत पार्ट वन – द हाँटेड शीप’ चित्रपटाचे पोस्टर एक शेअर केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो आणखी एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट एक भयपट असणार आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. ‘भूत’ चित्रपटाचे अनेक भाग येणार असून, याचा पहिला भाग ‘भूत- द हाँटेड शिप’ 15 नोव्हेंबर 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विकी सोबतच अभिनेत्री भूमी पेडणेकर सुध्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Nothing haunts you more than reality. Presenting #Bhoot Part One – The Haunted Ship, directed by @Bps_91. In cinemas 15th November, 2019. @karanjohar @apoorvamehta18 @shashankkhaitan @DharmaMovies pic.twitter.com/CnONsJs3bp
— Vicky Kaushal (@vickykaushal09) June 10, 2019