बॉलिवुडमधील आगामी “थलाइवी’ या चित्रपटातील अभिनेत्री कंगणा रणावतचा पहिला लुक टीजर आणि पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट तमिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. यात जयललिताच्या भूमिकेत कंगणा झळकणार आहे. यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत असतांना कंगणाच्या पुन्हा एका चित्रपटाचे पोस्टर आऊट झाले आहे. या चित्रपटाचे नाव पंगा आहे.
Jo sapne dekhte hain woh #Panga lete hain. Prashant, Jaya aur Adi ki kahaani hum sab se
judi hai. Trailer out on 23rd Dec! #Pangastories @foxstarhindi @Ashwinyiyer @kanganateam @jassiegill @Neenagupta001 @richachadha @YagyaBhasin@ShankarEhsanLoy @Javedakhtarjadu #KanganaRanaut pic.twitter.com/hYOt29vQ1v— Atul Mohan (@atulmohanhere) December 19, 2019
दरम्यान, तिचा आगामी चित्रपट ‘पंगा’ या चित्रपटातही ती हटके भूमिकेत दिसणार आहे. बहिण रंगोली चंदेलनं या चित्रपटातील कंगनाचा लुक शेअर केला आहे. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कंगना रनौट सध्या वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतेय. या चितपटात सुद्धा ती आईची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी ‘मणिकर्णिका’ नंतर या चित्रपटात कंगना पुन्हा एकदा आईच्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान,’फोटो शेअर करताना रंगोलीनं लिहिलं की, कंगना म्हणते ‘जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला आईची भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात येतं तेव्हा तो तिचा अपमान असतो’. पंरतू ‘मणिकर्णिका’मध्ये आईची भूमिका यशस्वीरित्या साकारल्यानंतर कंगना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा आई साकारताना दिसणार आहे. यशाच्या शिखरावर असणारी अभिनेत्री आईची भूमिका साकारत आहे. हा नवा भारत आहे; ज्याला ‘पंगा’ घ्यायला आवडतं, असं रंगोलीनं म्हटलं आहे.