बलात्कार पिडितेला धमाकावण्यासाठी पोस्टर; एकाला अटक

लखनऊ : बागपत येथे सामुहिक बलात्कार प्रकरणातील पिडितेला धमकावणारे भित्तिपत्र लावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. दिल्ली न्यायलयात शुक्रवारी साक्ष देऊ नये म्हणून त्यात धमकावण्यात आले होते. या पिडितेने मागितल्या प्रमाणे तिला सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.

या पिडीतेला उन्नाव सारख्या परिणामांना तोंड द्यावे लागू शकेल अशी धमकी या पोस्टरमध्ये देण्यात आली होती. यानंतर पिडितेने मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्याकडे संरक्षण पुरवण्याची मागणी केली होती.

राजधानी दिल्लीतील मुखर्जीनगर भागात या पिडीतेवर गेल्यावर्षी सामुहिक बवलात्कार करण्यात आला होता. यातील आरोपी सोहरनसिंह हा तिच्या गावातील असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. सोहरनने तिला खाद्यापदार्थातून अंमली पदार्थ दिले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्याचा व्हिडिओ बनवून त्याआधारे ब्लॅकमेल करत वारंवार बलात्कार करत असे.

सोहरनसिंह याला यापुर्वी अटक करण्यात आली होती. त्याला बुधावारी जामीन मिळाला. त्यानंतर हे पोस्टर लावण्यात आले. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली. आरोपीने गावावतील काही हितशत्रूंनी आपल्याला लटकावण्यासाठी हे पोस्टर लावल्याचा दावा आरोपीने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.