पुण्यात ‘डाक अदालत’ पुन्हा भरणार

पुणे – सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर टपाल खात्याच्या पुणे विभागातर्फे 28 सप्टेबरला 57 वी डाक अदालत भरवण्यात येणार आहे. पुणे स्टेशन जवळील जनरल पोस्ट  आॅफिस अर्थात जीपीओ येथे ही अदालत भरणार आहे.

टपाल खात्याच्या सेवांबद्दल काही तक्रारी असल्यास त्या लेखी स्वरूपात टपाल पाकिटाव्दारे पाठवाव्यात. सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल आर. एस. गायकवाड यांच्या कार्यालयात या तक्रारी पाठवाव्यात. टपालाने येणाऱ्या तक्रारींचीच दखल घेण्यात येईल. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. असे आवाहनही टपाल खात्याने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.