नवी दिल्ली – करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून येत असल्यामुळे संदिग्ध वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत कोर्टाच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचना पोस्ट विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
यासंदर्भात केंद्र सरकारने आमच्याकडे काही मार्गदर्शक सूचना अद्याप पाठविल्या नाहीत. मात्र परिस्थितीपूर्व खबरदारीची उपाययोजना म्हणून कर्मचाऱ्यांनी सावध राहून काम करावे असे सांगण्यात आले आहे. पोस्टाचे कर्मचारी विविध कामासाठी बाहेर जात असतात त्यांनी मास्क घालावा आणि सुरक्षित व्यवहार करावे.
त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना लागण झाली तर अशा परिस्थितीत काय करावे हे कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. लॉकडाऊनमध्ये पोस्टाच्या सेवा चालू होत्या. पोस्टाची सेवा जीवनावश्यक समजली जाते. पोस्टाच्या माध्यमातून औषधांचा पुरवठाही केला जातो.