मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करीत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पाचे शेअर बाजारातही स्वागत होताना दिसत असून बाजार सुरु झाला तेव्हा तो ४०१ अंकांनी वधारला होता. अर्थमंत्री बजेट सादर करत असताना देखील सेन्सेक्समध्ये वाढ झाली असून तो आतापर्यंत ८९९ अंकांनी वधारला आहे.
सेन्सेक्समध्ये वाढ झाल्याने आता तो ४७,१८५.७५ वर पोहोचला आहे. सकाळी बजेट सादर होण्यापूर्वी बाजार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स ४४३ ने तर निफ्टी ११५ अकांनी वधारला होता. सेन्सेक्सच्या चार्टनुसार, इंड्सलँड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, टायटन या कंपन्यांचे शेअर्स प्रामुख्याने आघाडीवर होते.
Sensex surges 899.98 points, currently at 47,185.75. pic.twitter.com/ta9GEGotls
— ANI (@ANI) February 1, 2021
शुक्रवारी सेन्सेक्स ५८८.५९ अकांची किंवा १.२६ टक्क्यांनी घट होत बंद झाला होता. त्यामुळे सेन्सेक्स ४६,२८५.७७ वर स्थिरावला होता. तर निफ्टी १८२.९५ अकांनी किंवा १.३२ टक्क्यांनी घसरला होता. त्यामुळे निफ्टी १३,६३४.६० अकांवर स्थिरावला होता.