मसूद अझहरवरील निर्बंधांबाबत सकारात्मक प्रगती : चीनचा दावा

अमेरिकेवर मात्र टीका

बिजींग – पाकिस्तानस्थित जैश ए मोहंम्मदचा म्होरक्‍या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रक्रियेमध्ये सकारात्मक प्रगती झाली आहे, असे चीनने म्हटले आहे. मसूदला काळ्या यादीत टाकण्यासाठी अमेरिकेने थेट सुरक्षा परिषदेकडे प्रस्ताव पाठवल्याबद्दल चीनने अमेरिकेवर टीकाही केली आहे. अशा प्रकारे थेट प्रस्ताव पाठवणे हे एक वाईट उदाहरण आहे, असे चीनने म्हटले आहे.

मसूद अझहरला संयुक्‍त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियम 1267 नुसार निर्बंध समितीपुढे फ्रान्सने मांडलेल्या प्रस्तवाला चीनने तांत्रिक कारण देऊन रोखले होते. त्याच्या दोन आठवड्यांनी अमेरिकेने मसूद अझहरवर प्रवास बंदी, मालमत्ता जप्ती आणि शस्त्रास्त्रविषयक निर्बंधांसाठी थेट सुरक्षा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला. मात्र चीनने दुसऱ्यावेळीही आपल्याच भूमिकेचे समर्थन केले. चीनकडून मसूदचा बचाव केला जात असल्याच्या अमेरिकेच्या आरोपांचे खंडनही चीनने केले होते.

मसूद विरोधी प्रस्ताव सादर झाल्यापासून चीनने विविध घटकांशी सातत्याने संपर्क ठेवला असून सकारात्मक प्रगतीही केली आहे. अमेरिकेला ही बाब चांगली माहित आहे, असे चीनच्य परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते गेंग शुआंग यांनी सांगितले. मात्र सकरात्मक प्रगती म्हणजे काय याचा तपशील त्यांनी दिला नाही. चीनने अलिकडच्या काळात चारवेळा मसूद अझहरविरोधी प्रस्तावांना विरोध केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.