138 अस्थायी पदांना मुदतवाढ
पुणे – राज्यातील ग्रंथालय संचालनालयाच्या अधिपत्त्याखालील कार्यालयांमधील 138 अस्थायी पदांना 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतताढ देण्यात आली आहे.
कार्यालयातील अ, ब, क, ड या वर्गातील 447 मंजूर पदे आहेत. यात 309 पदे स्थायी स्वरुपाची आहे. उर्वरित पदे अस्थायी स्वरुपाची आहेत. 1 मार्च ते 30 सप्टेंबरपर्यंत अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. मुदतवाढ देण्याचे अधिकार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार मान्यताही देण्यात आलेली आहे.
ग्रंथालय उपसंचालक 1, सहायक ग्रंथालय संचालक, ग्रंथपाल वर्ग 2, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, हस्तलिखित अधिकारी, लेखाधिकारी 21, जिल्हा ग्रंथपाल, तांत्रिक सहायक, ग्रंथालय निरीक्षक, वितरण सहायक 28, मुख्य लिपिक 3, वरिष्ठ लिपिक 7, निर्गम सहायक 3, कनिष्ठ लिपिक 31, वाहन चालक 2, आलमारी परिचर, ग्रंथ परिचर, पृथ:कार, नाईक, ग्रंथवाहक, ग्रंथ बांधणीकार 6, शिपाई, चौकीदार, हमाल, माळी, सफाई कामगार 36 याप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ मिळाली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल सावरे यांनी मुदतवाढीचे आदेश काढले आहेत.
योजना संपलेल्या नाहीत
ग्रंथालय संचालनालयाकडे असलेल्या विद्यमान योजनांपैकी कोणतीही योजना संपलेली नाही. पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंधास उच्चस्तर सचिव समितीची मान्यता घेण्यात यावी. ज्या प्रयोजनासाठी पदे निर्माण केलेली आहेत त्याच प्रयोजनासाठी ती चालू ठेवण्यात आली आहेत.