मुंबई – नव्वदीच्या दशकातील तमाम सिनेरसिकांवर आणि दर्दी प्रेमीयुगुलांवर आपल्या मनमोहक आवाजाने मोहिनी घालणारे प्रसिद्ध बॉलिवूड गायक “कुमार सानू’ यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती कुमार सानू यांचा मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
गुरुवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता दुबईच्या मार्गाने कुमार सानू अमेरिकेतील लॉस एँजिल्स शहरात जाणार होते. पण विमानाने प्रवास करण्यापूर्वी त्यांची कोरोना तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
सध्या मुंबई महानगरपालिकेने कुमार सानू यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. अमेरिकेतील लॉस एँजिल्स शहरामध्ये कुमार सानू यांची पत्नी सलोनी आणि दोन मुली सना आणि एना हे राहतात. आता नुकतंच 20 ऑक्टोबर रोजी कुमार सानू यांचा वाढदिवस आहे.