मनाला सुन्न करणारी बातमी, लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : प्रख्यात पत्रकार,  हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.  त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

याबाबत सविस्तर माहिती इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्विट दिली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,’मित्रांनो खूपच धक्कादायक बातमी आहे. लोकप्रिय टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन झालंय. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन.’असं ट्विट राजदीप सरदेसाई यांनी केलं आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.