‘अनुपमा’ मालिकेचा लोकप्रिय अभिनेत्याने घेतला निरोप; चाहत्यांची मागितली माफी

Sudhanshu Pandey | स्टार प्लसवरील ‘अनुपमा’ ही मालिका लोकप्रिय ठरत आहे. ही मालिका टीआरपी यादीत देखील अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ‘अनुपमा’ मालिकेत अभिनेत्री रूपाली गांगुली ही अनुपमाची भूमिका साकारत आहे. तर वनराज शाहची भूमिका सुधांशू पांडे साकारत होता. मात्र आता सुधांशूने ही मालिका सोडली आहे. सुधांशूने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
सुधांशूने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत सांगितले की, “तुम्हा सर्वांना माहितच आहे की मी गेल्या चार वर्षांपासून अनुपमा या मालिकेशी जोडला गेलोय. या भूमिकेमुळे मला खूप सारं प्रेम आणि तेवढीच प्रेक्षकांची नाराजीसुद्धा मिळाली. पण ती नाराजी माझ्यासाठी प्रेमच आहे. कारण जर तुम्ही माझ्यावर नाराज झाले नसता, तर मी माझं काम योग्य करतोय असं वाटलंच नसतं. आज मी तुम्हाला जड अंत:करणाने हे सांगू इच्छितो की मी यापुढे अनुपमा या मालिकेत दिसणार नाही. Sudhanshu Pandey |
View this post on Instagram
रक्षाबंधनपासूनच मी ही मालिका सोडली आहे. इतके दिवस झाले आणि माझ्या प्रेक्षकांना असं वाटू नये की मी न सांगताच निघून गेलो, म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करतोय. आता मी या मालिकेत वनराज शाहची भूमिका साकारताना दिसणार नाही. तुम्हा सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद आणि माफ करा कारण मला अचानक हा निर्णय घ्यावा लागला आहे.” सुधांशू पांडेनं ‘अनुपमा’ मालिका सोडल्यानं त्याचे चाहते नाराज झाले आहेत. Sudhanshu Pandey |
दरम्यान, ‘अनुपमा’ मालिकेत ‘वनराज’चे पात्र सुधांशूने उत्तमरित्या साकारले होते. मात्र आता त्याच्या जागी या मालिकेत कोणता नवा अभिनेता पाहायला मिळणार याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.
हेही वाचा :
सुषमा अंधारेंनी राणे – जयदीप आपटेंचे फोटो दाखवत शिंदे सरकारला विचारला प्रश्न,’यांचा काय संबंध…’





