मुंबई – कोलंबियाची पॉप स्टार शकीरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी ती गाण्यांमुळे नाही तर टॅक्स फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. स्पेनच्या एका न्यायालयाने शकीराचे कर फसवणुकीचे अपील फेटाळले आहे. रिपोर्ट्सनुसार, शकीराला डील याचिका ऑफर करण्यात आली होती, परंतु तिने ही डील याचिका फेटाळली आहे.
यानंतर, स्पेनच्या सरकारी वकिलांनी या प्रकरणी सांगितले की, आम्ही शकीराला 8 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची मागणी करणार आहोत. यासोबतच आम्ही 24 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 195 कोटी रुपयांच्या दंडाची मागणी करणार आहोत. मात्र, अद्याप कोर्टाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही आणि खटल्याची तारीखही देण्यात आलेली नाही.
मी न्यायालयात माझे निर्दोषत्व सिद्ध करेन
शकीरानेही तिच्या वकिलामार्फत एक निवेदन जारी करून डील याचिका फेटाळली. ती म्हणते,’मी निर्दोष आहे आणि आता हे प्रकरण कोर्टात जाऊ द्या. मी तेथे करचुकवेगिरीच्या सर्व आरोपांवर माझे निर्दोषत्व सिद्ध करेन. मी कोणत्याही प्रकारचा कर चुकवला नाही.’
शकीरावर करचुकवेगिरीचा आरोप पहिल्यांदा 2018 मध्ये चर्चेत आला होता. त्यावेळी, स्पॅनिश वकिलांनी आरोप केला होता की सिंगरने 2021 ते 2014 पर्यंतच्या कमाईवर सुमारे 155 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 120 कोटी रुपये जमा केले नाहीत. या प्रकरणी शकीराही जून २०१९ मध्ये कोर्टात हजर झाली होती.