पॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना

किंग खान अर्थात शाहरूख खानची मुलगी सुहाना ही बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय सिलेब्रिटी किड्‌सपैकी एक आहे. मोठया पडद्यावरील तिच्या पर्दापणाची चर्चा आतापासूनच रंगत आहेत.

भलेही सुहानाचे चित्रपटसृष्टीत पर्दापण अनिश्‍चित आहे. पण याबाबत निश्‍चित झाले आहे की, ती कोणत्या अभिनेत्यासह डेट करू इच्छित आहे. आपल्या फॉलोअर्स आणि मित्रांसोबत एका इंस्टाग्राम चॅट सेशनमध्ये सुहानाला याबाबत विचारण्यात आले होते.

याला उत्तर देताना सुहानाने साउथ कोरियन पॉप सिंगर, अभिनेता, सॉन्गरायटर आणि मॉडल किम जुन म्यों याचे नाव घेतले होते. जो “सूहो’ या नावाने ओळखला जातो. या उत्तरादाखल सुहानाने किमचा एक फोटो पोस्ट केला होता.

दरम्यान, सुहानाच्या पर्दापणाबाबत स्वःत शाहरुखने खुलासा केला होता की, सुहाना चित्रपटांमध्ये अभिनय करू इच्छित असून यामध्येच ती आपले करियर करणार आहे. काही दिवसांपूर्वी “झिरो’च्या प्रमोशनवेळी एका मुलाखतीत तो म्हणाला, सुहाना सध्या शिकत आहे आणि मला वाटते की सुहानाने आणखीन 3 ते 5 वर्षे थिअटरमध्ये काम करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.