मुंबई – 70 च्या दशकातील सर्वात मोठ्या पॉप स्टारपैकी एक आणि चार वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका आणि अभिनेत्री ऑलिव्हिया न्यूटन जॉन यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ऑलिव्हियाचे पती जॉन इस्टरलिंग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्या मृत्यूची पुष्टी केली. ऑलिव्हिया न्यूटन जॉन यांची सोमवारी त्यांच्या दक्षिण कॅलिफोर्नियातील घरी निधन झाले.
जॉन इस्टरलिंगने ऑलिव्हियाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून पत्नीच्या मृत्यूची माहिती दिली. जॉनने लिहिले, ‘डेम ऑलिव्हिया न्यूटन-जॉन यांचे आज सकाळी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये निधन झाले. यावेळी ती तिच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत होती. आम्ही सर्वांना विनंती करतो की कृपया या कठीण काळात कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा.” ते पुढे म्हणाले की,’ऑलिव्हिया गेल्या 30 वर्षांपासून स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त आहे. ऑलिव्हियाच्या पश्चात पती जॉन इस्टरलिंग, मुलगी क्लो लॅटोन्झी, बहीण सारा नटर जॉन, भाऊ टोबी न्यूटन जॉन यांच्यासह अनेक लोक आहेत.’
ऑलिव्हिया न्यूटन जॉनने सप्टेंबर 2018 मध्ये खुलासा केला होता की ती कर्करोगावर उपचार घेत होती. 90 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात आणि 2017 मध्ये स्तनाच्या कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर तिचे हे तिसरे कर्करोगाचे निदान होते.
ऑलिव्हिया न्यूटन जॉनने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1971 मध्ये ”इफ नॉट फॉर यू” या चित्रपटाने पहिले मोठे यश मिळाले. गाण्याच्या यशामुळे ती बिलबोर्डच्या हॉट 100 चार्टवर 25 व्या क्रमांकावर पोहोचली. 1973 मध्ये ‘लेट मी बी देअर’साठी त्यांना पहिला ग्रॅमी मिळाला.