जुन्या सोलापूर रोडची अतिक्रमणांमुळे वाट

लोणी हद्दीतून उरुळी कांचनपर्यंतची स्थिती

सोरतापवाडी – जुना सोलापूर रस्ता म्हणून ओळख असलेल्या लोणी हद्दीतून उरूळी कांचनपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पूर्वी मोठा असणारा रस्ता आता अनेकजणांनी गिळंकृत केला आहे. लोणी हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण केली आहेत. थेऊर रोडला जोडणारा हा रस्ता पुनावाला स्टड फार्म येथे मोठा आणि दर्जेदार आहे. तेथून पुढे शेतीत व गुंठेवारीत हा रस्ता हरवून गेला आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहेत. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

लोणी येथील गायकवाड वस्ती, वाघुले वस्ती, गाढवे मळा, थेऊर, नायगाव व पेठ कोरेगावमूळ भागांचा समावेश आहे. संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचले की नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी अनेक नागरिक व विद्यार्थी घसरुन पडले आहेत. रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने दुचाकीस्वार व वाहनचालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. प्रसंगी अपघात होण्याची शक्‍यता आहे. या ठिकाणी एक कंपनी असून दोन वर्षांपूर्वी या रस्त्याने या कंपनीचे मोठे ट्रक जात होते.

त्यावेळी नागरिकांनी उपोषण व आंदोलन केल्यानंतर कंपनीने जड वाहतूक बंद करून हा रस्ता करून देण्याचे मान्य केले होते. येथून हलक्‍या वाहनांची वाहतूक करण्याचे मान्य केले होते. परंतू स्थानिक ग्रामस्थांच्या वादात रस्ता झाला नाही. पण त्यावेळी या रस्त्यावर फक्‍त डांबराचा थर टाकून गावकऱ्यांच्या मागणीवर मलमपट्टी केली होती. आता डांबर गायब होऊन रस्त्यावर फक्‍त खड्डेच दिसत आहेत.

हा रस्ता उरुळी काचंनला जाण्यासाठी जवळचा आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होतो. या रस्त्याचे काम अद्यापही अपुरे असल्याने ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता लवकर पूर्ण करा, अशी मागणी होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)