उत्तरप्रदेश – भारतीय महिला क्रिकेट संघाने आज २०-२० विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यामध्ये विजय सलामी दिली. यजमान ऑस्ट्रेलियन संघाविरोधात प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने २० षटकांमध्ये १३२ धावांचे आव्हान उभे केले होते. विजयासाठी १३३ धावा आवश्यक असताना भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ ११५ धावांवर तंबूत परतला.
दरम्यान, आजच्या सामन्यात ४ बळी घेत स्टार गोलंदाज ठरलेल्या पूनम यादवच्या आई मुन्नी देवी यांनी भारतीय संघाच्या विजयाबाबत समाधान व्यक्त केले आहे. भारतीय संघाच्या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “सामन्याच्या सुरुवातीला मुली थोड्या अडखळल्या. त्यानंतर मात्र आघाडी घेत त्यांनी शेवटपर्यंत चांगला खेळ केला. भारतीय संघाच्या विजयाबाबत खुश असून मला सर्व खेळाडूंचा अभिमान वाटतो.”
Munni Devi, mother of Poonam Yadav who took 4 wickets in today’s #AUSvIND T20 World Cup 2020: I am very happy and proud on India’s victory today. The girls started off with a little bit of difficulty but managed the game well till the end. #Agra pic.twitter.com/xMNNL7JLhq
— ANI UP (@ANINewsUP) February 21, 2020