Pooja Sawant Accident : पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात; अभिनेत्री थोडक्यात बचावली
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता ऋषी मनोहर यांच्या गाडीला (Pooja Sawant Accident) सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे भीषण अपघात झाला आहे.

Pooja Sawant Accident : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता ऋषी मनोहर यांच्या गाडीला (Pooja Sawant Accident) सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे भीषण अपघात झाला आहे. आपल्या आगामी ‘कपबशी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुणे येथून सांगलीकडे जात असताना हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून, गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत.
कसा झाला अपघात?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे (Pooja Sawant Accident) प्रसिद्धी प्रमुख (पीआर) दर्शन मुसळे हे एकाच गाडीतून सांगलीच्या दिशेने प्रवास करत होते. सातारा जिल्ह्यातील काशीळ परिसरात आले असता, तीन वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातामध्ये पूजा सावंत यांच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अपघाताची भीषणता पाहता मोठी दुर्घटना घडू शकली असती, परंतु सुदैवाने पूजा सावंत आणि ऋषी मनोहर यांना केवळ मुक्कामार लागला असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीतील सर्व प्रवासी सध्या सुरक्षित आहेत.
अपघाताचे फोटो आले समोर
अपघातानंतरचे (Pooja Sawant Accident) काही फोटो सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये समोर आले आहेत. यामध्ये कलाकारांच्या गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला असून गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा अपघात नेमका कोणत्या वाहनाच्या चुकीमुळे किंवा कसा झाला, याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त
गेल्या काही दिवसांपासून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर हे आपल्या ‘कपबशी’ या चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते महाराष्ट्रातील विविध शहरांचा दौरा करत होते. याच दौऱ्यादरम्यान सांगलीला जात असताना काळाने हा घाला घातला, मात्र सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले.
१९ जूनला ‘कपबशी’ होणार रिलीज
पूजा सावंत (Pooja Sawant Accident) आणि नवोदित अभिनेता ऋषी मनोहर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कपबशी’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंत, पूजा सावंत, नवोदित चेहरा ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, आनंद इंगळे, आनंद काळे, चिन्मय शिंत्रे, उमा सरदेशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.






