शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील प्रगतशिल शेतकरी भाऊसाहेब रामदास माशेरे यांच्या गोमातेला एक अनोखा सन्मान मिळाला आहे. गोमातेला मुंबई येथे नेऊन गोमातेचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील सागर या निवासस्थानी पूजन केले. यावेळी फडणवीस यांनी दर्शन घेऊन सन्मानपुर्वक अशिर्वाद घेतला आहे.
आमदाबाद येथून टेम्पोने गोमातेला मुंबई येथे नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करुन मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी ते रवाना झाले. कार्यक्रमाचे नियोजन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी केले.
यावेळी शिरुर तालुक्यातील प्रगतशिल शेतकरी भाऊसाहेब माशेरे सोसायटीचे चेअरमन आबासाहेब जाधव, नितीन थोरात, नितीन माशेरे, वैभव जाधव, अशोक नामदेव माशेरे, मान्यवर उपस्थित होते. आमदाबाद गावच्या या गोमातेस मिळालेल्या या आगळ्यावेगळ्या सन्मानाचे शिरूर तालुक्यातील शेतकरी कौतुक करीत आहेत.