मुंबई – ‘बिग बॉस 5’ मध्ये दिसलेल्या पूजा मिश्राने शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा मिश्राने सिन्हा कुटुंबावर तिचं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. तसेच पूजा मिश्राने शत्रुघ्न सिन्हा आणि कुटुंबीयांनी तिच्यासोबत ‘सेक्स स्कॅम’ केल्याचा आरोपही केला आहे.
पुजा मिश्रा म्हणाली की, शत्रुघ्न सिन्हा तिला बेशुद्ध करून माझा देहव्यापार करायचे. आपलं कौमार्य विकूनच त्यांनी मुलगी सोनाक्षीला स्टार बनवले. पूजा मिश्रा सांगते की तिने 17 वर्षांपासून हे सहन केले आहे. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने आत्महत्या केली असती, असंही ती म्हणाली.
पूजा मिश्रा पुढे म्हणाली, सोनाक्षी सिन्हा बॉलीवूडमध्ये काम करत आहे. पण आज माझा पत्ता कट झालाय. माझे वडील आयकर अधिकारी होते. 2005 मध्ये ते निवृत्त होऊन पुण्याला गेल्यानंतर पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी माझ्यावर दडपशाही केली. व्हिडिओकॉनच्या गेस्ट हाऊसमध्ये राहात असताना पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी माझ्यावर काळी जादू केली. मी त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होऊ नये याची भिती दोघांना वाटत असयाची, असंही पूजा मिश्राने म्हटलं.
पूजा मिश्राच्या या आरोपांनी खळबळ उडाली आहे. पूजा मिश्राने शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर असे आरोप केले आहेत, जे अतिशय धक्कादायक आहेत. मात्र, यावर शत्रुघ्न सिन्हा किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.