Pooja Khedkar । वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी डॅा.पूजा खेडकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय यूपीएससीने घेतला आहे. डॅा.पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस यूपीएससी देतेय, अशी माहिती यूपीएससीने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे.
या प्रकणावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. राजकीय नेतेही यावरून यूपीएससीकडे मागणी करतांना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पावर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वस्थेला लागलेली ही कीड कायमची दूर करण्यासाठी आतातरी सरकार पुढाकार घेणारा का? असा प्रश्न विचारला आहे.
Pooja Khedkar । नेमकं काय म्हणाले रोहित पवार ?
पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने #UPSC च्या पारदर्शकतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं… असं होत असेल तर #UPSC कडून दरवर्षी निवड झालेल्यांमध्ये उघड न झालेल्या अनेक #पूजा_खेडकर का असणार नाहीत? मला वाटतं यानिमित्ताने बोगस भरती शोधून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे… तरच पात्र आणि खऱ्या गुणवंतांना न्याय मिळेल… नाहीतरी वाळवी लागलेली संपूर्ण सिस्टीम आज सर्वसामान्य माणसालाच पोखरत असल्याचं दुर्दैवाने बघत बसावं लागत आहे. त्यामुळं व्यवस्थेला लागलेली ही कीड कायमची दूर करण्यासाठी आतातरी सरकार पुढाकार घेणारा का?
पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने #UPSC च्या पारदर्शकतेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं… असं होत असेल तर #UPSC कडून दरवर्षी निवड झालेल्यांमध्ये उघड न झालेल्या अनेक #पूजा_खेडकर का असणार नाहीत? मला वाटतं यानिमित्ताने बोगस भरती शोधून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे… तरच…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2024
तत्पूर्वी, विवादित आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाला आणखी धक्का बसला आहे. तळवडे येथील खेडकर कुटुंबाशी संबंधित असलेल्या थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड कंपनीला महापालिकेने सील केले आहे. थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड कंपनीने महापालिकेचा मालमत्ता कर थकविल्याने कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने शु्क्रवारी (दि. १९) सील ठाेकले आहे. या कंपनी संचालकाकडे महापालिकेचा दोन लाख ७७ हजार रूपयांची कराची थकबाकी आहे.
तळवडे गावठाण, ज्याेतिबानगर येथे थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड ही कंपनी आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे. त्यामुळे कंपनी वादाच्या भोव-यात अडकली आहे. कंपनी म. दि. खेडकर यांच्या नावे आहे. महापालिकेने यासंदर्भातची सर्व कागदपत्रे तपासली आहेत.