टॉलीवूडनंतर बॉलीवूडमध्ये आपला जलवा दाखविणारी अभिनेत्री पूजा हेगडेचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. याबाबत अभिनेत्रीने स्वत: ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. यापूर्वीही अनेक सेलीब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचे प्रकार घडले आहेत. यात बिग बी अर्थात अमिताभ बच्चन, शाहिद कपूर, हृतिक रोशन आदींचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅकर्सनी हॅक केले होते.
पूजाने तिच्या ट्विटर हॅंडलवरून लिहिले की, “नमस्कार मित्रांनो. माझ्या टीमने मला सांगितले आहे की माझे इन्स्टा अकाउंट हॅक झाले आहे. यासाठी माझी डिजिटल टीम मला मदत करीत आहे. कृपया, यावरून आलेले कोणतेही निमंत्रण आपण स्वीकारू नका किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका. धन्यवाद.
दरम्यान, अभिनेत्री पूजा हेगडे ही मिस युनिव्हर्स इंडियाची रनर-अप राहिलेली आहे. ती दाक्षिणात्य आणि बॉलिवूड या दोन्ही चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे. गतवर्षी पूजा हेगडे दक्षिण सुपरस्टार महेश बाबूसमवेत “महर्षी’ आणि अक्षयकुमारसोबत “हाऊसफुल 4′ मध्ये झळकली होती. पूजाने हृतिक रोशनच्या “मोहेंजोदडो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते.